पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थव्यवस्था असो की क्रिकेट, सगळीकडेच निराशा, पाकचे सरन्यायाधीश हताश

पाकिस्तानचे सरन्यायाधीश असिफ सईद खोसा  (Twitter/Asif Saeed Khosa )

पाकिस्तानचे सध्या वाईट दिवस सुरु आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांना अपयश येताना दिसत आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश असिफ सईद खोसा हे तर देशाच्या सद्यस्थितीवर अत्यंत हताश झाले आहेत. सध्या पाकिस्तानी नागरिकांना वाईट बातम्याच ऐकाव्या लागत आहेत. देशाची अर्थव्यवस्था असो किंवा राजकारण इतकेच काय क्रिकेटच्या मैदानातूनही निराशाजनक बातम्या येत आहेत, अशी खंत न्या. खोसा यांनी व्यक्त केली. 

न्या. खोसा हे बुधवारी एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असणे, ही चांगली बातमी नसल्याचे ते म्हणाले. 

दहशतवादी पराभूत झाल्यामुळेच लष्करी जवानांवर हल्ले: सत्यपाल मलिक

वृत्त वाहिनीवर पाकसाठी चांगली बातमी नाही म्हणून आम्ही वाहिनी बदलून क्रिकेटचा सामना पाहावा म्हटले तर दुर्देवाने तिकडूनही निराशाजनक बातमी येते, असे खोसा यांनी म्हटल्याचे दुनिया न्यूजने म्हटले आहे. आयसीसी विश्वचषकात पारंपारिक प्रतिस्पर्धी भारताकडून पराभूत झाल्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया समोर आली होती. अशा वाईट बातम्यांमध्ये फक्त पाकिस्तानच्या न्यायालयीन क्षेत्रातून चांगली बातमी येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

अशा नैराश्यजनक वातावरणात मला एक चांगली गोष्ट सांगायला आनंद होतो की, एवढ्या सर्व वाईट बातम्यामध्ये एका क्षेत्रातून खूशखबर आली आहे. मॉडेल न्यायालयाच्या माध्यमातून केवळ ४८ दिवसांत सुमारे ५८०० खटले निकालात काढण्यात आली आहेत. ही आमची संविधानात्मक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

मी पाकिस्तानी संघाची आई नाही, विणावर भडकली सानिया मिर्झा

दरम्यान, पंतप्रधान इमरान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे बेलआऊट पॅकेजची मागणी केली आहे. यातून पाकिस्तानी अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.