पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पावसासाठी बेडकांचं लावलं लग्न, अतिवृष्टी झाल्यानंतर घेतला काडीमोड

बेडकांचं लग्न

नुकतंच लग्न लावून दिलेली  बेडकांची जोडी आता कुठे आपल्या संसारास सुरूवात करत होती, मात्र  मानवानं निष्ठुरपणे या जोडीला एकमेकांपासून विलग केलं, अशा उपहासात्मक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होता. 

बापरे ! गणेशाच्या हातातील लाडूसाठी मोजले तब्बल १७ लाख ६० हजार

भोपाळवासीयांवर  वरुण देवानं  कृपा करावी यासाठी काही दिवसांपूर्वी बेडकांचं लग्न लावण्यात आलं होतं. ओम शिव सेवा शक्ती मंडळाच्या सदस्यांनी वरुण देवतेला खूश करण्यासाठी बेडकांचं लग्न लावलं होतं. अनेक गावात पाऊस चांगला पडावा यासाठी बेडकांचं लग्न लावण्याची प्रथा आहे. 

बेडकाचं  लग्न लावल्यानंतर सुरूवातीला चांगला पाऊस पडला मात्र आता अनेक भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जर बेडकांचा काडीमोड करुन दिला तर अतिवृष्टीचं संकट टळेन असं मत या मंडळांच्या सदस्यांनी दी न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केलं आहे. 

सुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक
सध्या या बातमीवर सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत.