पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

योगी आदित्यनाथ यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या पत्रकाराविरुद्ध आणखी गुन्हे

प्रशांत कनोजिया

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियामध्ये शेअर केल्यावरून अटक करण्यात आलेले दिल्लीस्थित मुक्त पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्यावर पोलिसांनी नव्याने काही गुन्हे दाखल केले आहेत. परवान्याशिवाय सुरू असल्यामुळे नोएडातील एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यालयालाही पोलिसांनी सील केले आहे. या वाहिनीच्या प्रमुखांना आणि संपादकांना अटकही करण्यात आली आहे. आदित्यनाथ यांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

'सगळे बलात्कार एकसारखे नसतात, विवाहित महिलेवरील बलात्कार वेगळा प्रकार'

पोलिसांच्या या कृतीचा माध्यमातील लोकांनी तीव्र निषेध केला आहे. 'एडिटर्स गील्ड ऑफ इंडिया'ने या कृतीचा निषेध केला असून, हा प्रकार म्हणजे कायद्याचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे. लखनऊच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक कलानिधी नैथानी म्हणाल्या, भारतीय दंडविधान संहितेतील कलम ५०५ अंतर्गत आमच्याकडे प्रशांत कनोजिया यांच्याविरुद्ध पुरावे आहेत. चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याविरोधात हे कलम तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ नुसारही आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

नोएडातील 'नेशन लाईव्ह' या वाहिनीचे कार्यालय दोन महिन्यांसाठी सील करावे, असे आदेश नोएडातील महानगरदंडाधिकारी शैलेंद्र मिश्रा यांनी दिले आहेत. या वाहिनीचे प्रमुख इशिका सिंग आणि संपादक अनूज शुक्ला यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हे आदेश जारी करण्यात आले. कानपूरमधील एका महिलेने योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांचा व्हिडिओ वाहिनीवरून प्रसारित केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.