पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

कोरोना

देशामध्ये कोरोना विषाणूने चौथा बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यापूर्वी दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एका-एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. भारतात कोरोना विषाणूने कहर केला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत १८० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर १५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजास्तव लोकल बंद करावी लागेल

पंजाब सरकारने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २० पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यावर बंदी घातली आहे. त्याचसोबत शुक्रवारी मध्यरात्रीपासून सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच राज्यभरात विवाह समारंभ, हॉटेल, बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्यमंत्री ब्रह्मा मोहिंद्र यांनी सांगितले की, शुक्रवारी मध्यरात्रीपासून बस, रिक्षा, टेम्पो वाहतूक सेवा बंद राहणार आहेत. 

PM मोदींच्या भाषणासंदर्भात चिदंबरम यांची 'मन की बात'

कोरोना विषाणूच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंजाब सरकारने स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या सात सदस्यांच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. पंजाबमधील सरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत पंजाबमधील १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. 

कोरोनाचा परिणाम: मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा राहणार बंद