पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! यूपीमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

चिमुकलीवर बलात्कार

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ४ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. कानपूरच्या नोबस्ता येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांसह तीन जणांना अटक केली आहे. तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. दोन आरोपी १३ वर्षांचे असून ते नववीमध्ये शिकतात तर तिसरा आरोपी ९ वर्षांचा असून तो पाचवीमध्ये शिकतो.

योगी सरकारने मशिदीसाठी अयोध्येजवळ दिली ५ एकर जागा

नोबस्ता येथे राहणारी ४ वर्षांची चिमुकली बुधवारी  शाळेतून घरी आल्यानंतर घरासमोर खेळत होती. दुपारी ती अचानक रडत-रडत घरी आली. तिच्या कुटुंबियांनी तिला का रडते असे विचारले. तर त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या दुकानदाराची दोन मुलं आणि त्याचा मित्र त्यांच्या घरी आला. त्यांनी ती गुडघ्यावर पडल्यामुळे रडत असल्याचे सांगितले. तर मुलीच्या आईने तिला जवळ घेऊन तिच्या पायाची तपासणी केली. तर तिच्या गुडघ्याला काहीच लागले नव्हते.  

महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत: मुख्यमंत्री

दरम्यान, चिमुकलीच्या आईने तिला शांत करुन तिला मांडीवर घेतले असता तिच्या हाताला रक्त लागले. चिमुकलीला विचारले असता पोटात दुखत असल्याचे तिने सांगितले. तसंच तिच्यासोबत नेमकं काय घडले हे सांगितले. हे ऐकताच तिच्या कुटुंबियांना धक्का बसला. चिमुकलीच्या कुटुंबियांनी याप्रकरणी ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.   

जन्मल्यानंतर ३० तासांत बाळालाही कोरोनाची लागण