पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

४ वर्षांच्या चिमुकलीने आधी कॅन्सरला आणि आता कोरोनाला हरवले

४ वर्षांच्या चिमुकलीची कोरोनावर मात

दुबईमध्ये राहणाऱ्या एका चार वर्षांच्या भारतीय मुलीने कोरोनावर मात केली असून तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यानंतर चिमुकलीला १ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० दिवसात तिने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. याआधी या चिमुकलीला कॅन्सर झाला होता. 

देशातील कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये

चिमुकलीला तिच्या आईमुळे कोरोनाची लागण झाली होती. तिची आई आरोग्य कर्मचारी असून तिला मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली होती. आईला कोरोना झाल्यामुळे चिमुकली आणि तिच्या वडिलांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये तिचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 

Covid19 टेस्ट किट भ्रष्टाचारावर राहुल गांधी म्हणाले,मोदीजी कारवाई करा!

चिमुकलीला कोरोना झाल्यामुळे सगळ्यांची चिंता वाढलेली कारण तिला आधी मागच्या वर्षी किडनी कॅन्सर झाला होता. तिने कॅन्सरविरोधातील लढाई जिंकली होती. तिला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अतिरिक्त काळजी घेतली होती. दुबईतील एका खासगी रुग्णायात तिच्यावर कॅन्सरवर उपचार सुरु होते. 

पुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे

डॉक्टरांनी सांगितले की, चिमुकलीवर कीमोथेरपी करण्यात आली होती त्यामुळे तिची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाली आहे. अशामध्ये तिला कोणताही गंभीर स्वरुपाचा आजार होऊन धोका निर्माण होऊ शकतो. त्यात तिला कोरोनाची लागण झाली. मात्र तिने कोरोनावर मात केली. आता तिला घरी सोडण्यात आले आहे. 

पुण्यातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चार IAS अधिकारी मैदानात, अजित पवारांचा निर्णय