पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी प्रिन्सेस डाएनाचा पुनर्जन्म, ४ वर्षांच्या ऑस्ट्रेलियन मुलाचा दावा

प्रिन्सेस डाएना

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका चार वर्षांच्या मुलानं आपण प्रिन्सेस डायनाचा  पुनर्जन्म असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या मुलाचं नाव बिली कॅम्पबेल असून तो ऑस्ट्रेलियाच्या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा डेव्हिड कॅम्पबेल यांचा मुलगा आहे. 

प्रिन्सेस डाएना यांचं काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं, मात्र निधनानंतर इतकी वर्षे उलटली तरी त्यांची लोकप्रियता ही ती तितकीच आहे. ब्रिटनच्या घराण्यातील समान्य जनतेत सर्वात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींपैकी त्या होत्या. सामान्य माणसांत त्यांचं सहजपणे वावरणं, त्यांची स्टाईल, त्यांचा बंडखोरपण सर्वांनाच आवडायचा. त्याच्यावर जगभरातील अनेक भाषांमध्ये भरभरून लिहिण्यात आलं आहे. 

आता ४ वर्षांच्या बिली कॅम्पबेल या मुलाच्या दाव्यामुळे प्रिन्सेस डाएना हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. १९९७ मध्ये प्रिन्सेस डाएना यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर १८ वर्षांनी बिलीचा जन्म झाला. 

बिलनं पूर्वीच आम्हाला तो प्रिन्सेस डाएना यांचा पुनर्जन्म असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर तो  अनेकदा प्रिन्सेस डाएना यांच्या बालपणीचेही अनेक प्रसंग सांगतो. तो  प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरीला आपली मुलं म्हणूनच संबोधतो, असंही डेव्हिड माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

डायना यांना एक भाऊ देखील होता ज्याचा जन्मल्यानंतर काही  वेळातच मृत्यू झाला होता, बिलीनं याही गोष्टींचा उल्लेख केला असल्याची माहिती डेव्हिड यांनी दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:four year old Australian boy Billy Campbell bizarrely claimed to be the reincarnation of Britain Princess Diana