पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनंतनागमध्ये चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

संग्रहित छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाच्या ऑपरेशनमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली. 

इराणनंतर इटलीतील २१८ प्रवाशांना आणले भारतात

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथील वाटरीगाम येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष अभियान पथक, राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरु केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. 

श्रीनगर-जम्मू मार्गावर लष्कर ए तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू महामार्गावर सुरक्षादलाने लष्कर ए तोयबाशी संबंधित एकास अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी नाकाबंदी करुन कुलगाममधील मालपोरा येथे त्याला अटक केली.

देशात कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली ९३ वर

अटक केलेली व्यक्ती खुदवानी येथील असून त्याचे नाव परवेज अहमद मट्टू असल्याचे सांगण्यात येते. त्याच्याकडून ३.७० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात नेले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Four terrorists have been neutralized by security forces and police in Dialgam area of Anantnag district Jammu and kashmir