पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले

इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले

इराकमधील उत्तरी बगदादमध्ये असलेल्या अमेरिकेच्या हवाईतळावर रविवारी रात्री ४ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये चार इराकी एअरमन जखमी झाले आहेत. वॉशिंग्टन आणि तेहरानदरम्यान सुरु असलेल्या तणावादरम्यान अमेरिकन हवाई दलाच्या जवानांनी बगदादचे अल-बलाड हवाईतळ सोडले आहे. या हल्ल्यासाठीही इराणकडे पाहिले जात आहे. कारण चार दिवसांपूर्वी ८ जानेवारीला इराणने अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र डागले होते. 

इराणचे कमांडर कासिम सुलेमानीचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. या हल्ल्यात अनेक अमेरिकी सैनिक ठार झाल्याचा दावा इराणणे केला होता. तर अमेरिकेने हा दावा फेटाळला होता. 

त्याचवेळी, या क्षेपणास्त्र हल्ल्यात यूक्रेनचे एक विमान कोसळले होते. यामध्ये १७६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला इराण त्यांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात विमान कोसळल्याचा इन्कार केला होता. नंतर त्यांनी चुकून डागलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हे विमान कोसळल्याचे मान्य केले होते.