पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बलुचिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले; ४ जणांचा मृत्यू

बलुचिस्तान बॉम्बस्फोट

पाकिस्तानातील बलुचिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. क्वेटाजवळील एका मशीदीमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहे. जखमी झालेल्यांना नजकीच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

भविष्यात अण्वस्त्रांचा वापर त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून - राजनाथ सिंह

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, क्वेटाजवळील कुचलक भागातील एका मशीदीमध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. या संपूर्ण परिसराला सील करण्यात आले आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही.  

बजरंग पुनियाला 'खेलरत्न' पुरस्कार जाहीर

 दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी बलुचिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात पोलिसांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले होते. या स्फोटामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह ५ जणांचा मृत्यू झाला होता तर ३८ जण जखमी झाले होते.

'नमाज पठण करतात म्हणून मुस्लिम बांधव रस्त्यावर हक्क सांगू