पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य प्रदेशमध्ये भीषण कार अपघात; ४ हॉकीपटूंचा दुर्दैवी मृत्यू

मध्य प्रदेश अपघात

मध्य प्रदेशच्या होशंगाबाद येथे सोमवारी भीषण कार अपघात झाला. या अपघातामध्ये राष्ट्रीय स्तरावरील ४ हॉकीपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना होशंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग - ६९ वर घडली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

निवडणूक प्रचाराचा धडाका सुरु; 'या' ठिकाणी होणार दिग्गजांच्या सभा

मिळालेल्या माहितीनुसार, होशंगाबाद येथे होणाऱ्या मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी हे हॉकीपटू जात होते. स्विफ्ट डिझायर कारमधून हे सर्व हॉकीपटू प्रवास करत होते. अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला धडकली. अपघाता दरम्यान कार भरधाव वेगात होती. 

निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदीचे आदेश

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधून ७ जण प्रवास करत होते. अपघातामध्ये ४ हॉकीपटूंचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु आहे.

भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही: असदुद्दीन ओवेसी