पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन

दिवंगत अभिनेते इरफान खान

सुप्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. एक चांगला अभिनेता चित्रपटसृष्टीने गमावला आहे. सुमारे दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आजारातून ते सावरले आहेत असे वाटत असतानाचा त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला आणि अखेर बुधवारी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्देवाने गेल्या आठवड्यात शनिवारी त्यांच्या आईचेही आजाराने निधन झाले. चारच दिवसांत इरफान यांनाही काळाने गाठले. 

अभिनेता इरफान खानचे निधन

इरफान यांच्या आई सईदा बेगम यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्याचदिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊनमुळे इरफान यांना आईची अखेरची भेटही घेता आली नाही. सईदा बेगम यांचे जयपूर येथे निधन झाले आणि इरफान पठाण हे लॉकडाऊनमुळे मुंबईतच अडकले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आपल्या आईचा अंत्यसंस्कार पाहिल्याचे बोलले जाते. जयपूर येथील चुंगी नाका कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली

अंग्रेजी मीडियम हा इरफान खान यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांच्याबरोबर करिना कपूर आणि राधिका मदान यांनी भूमिका केली होती. परंतु, कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाई करु शकला नाही. परंतु, त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले.