पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

हैदराबाद बलात्कार प्रकरण

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. पोलिस तपासावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना चारही आरोपींचे पोलिसांनी एन्काऊंटर केले आहे. नॅशनल हायवे क्रमांक ४४ वर पोलिसांनी आरोपींचे एन्काऊंटर केले. दरम्यान, या घटनेनंतर देशभरातून तेलंगणा पोलिसांचे कौतुक केले जात आहे. तेलंगणा पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून दिला असल्याची प्रतिक्रिया येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा पोलिस तपासासाठी शुक्रवारी पहाटे ३ वाजता आरोपींना गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांच्या हातातील बंदुक हिसकावून त्या ठिकाणावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करत आरोपींवर गोळीबार केला. गोळीबारामध्ये चारही आरोपींचा मृत्यू झाला. दरम्यान, देवानेच आरोपींना शिक्षा दिली असल्याची प्रतिक्रिया तेलंगणाचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी दिली आहे. 

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चिट

हैदराबादमध्ये २८ नोव्हेंबर रोजी महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी ३६ तासातच चारही आरोपींना अटक केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या ४ आरोपींची नावे आहेत. यामधील तीन आरोपी २० वर्षाचे तर एक २६ वर्षाचा होता. चारही आरोपी तेलंगणामध्येच राहणारे होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी देशभरातून केली जात होती.

 

हैदराबाद बलात्कार प्रकरण : असा लावला पोलिसांनी नराधमांचा छडा