पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवृत्तीनंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, पक्षाच्या नेत्याचा दावा

अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी धोनीची भेट घेतली होती

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर महेंद्रसिंह धोनी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते संजय पासवान यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की या संदर्भात धोनीशी खूप दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असल्यामुळे त्यातून निवृत्तीचा निर्णय घेतल्यावरच तो पुढे काय करायचे हे ठरवेल. 

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवेळी धोनीच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर संजय पासवान यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताचे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारतीय संघ रविवारीनंतर मायदेशी परतण्याची शक्यता आहे.

पासवान म्हणाले, धोनी माझा चांगला मित्र आहे. तो जगप्रसिद्ध खेळाडू आहे. त्यामुळे त्याने भाजपमध्ये यावे यासाठी त्याच्याशी बोलणी झाली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'संपर्क फॉर समर्थन' अभियान सुरू केले होते. त्यावेळी त्यांनी महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली होती. या भेटीनंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा जोराने सुरू झाली होती. धोनी भाजपमधील अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या आणखी एका नेत्याने सांगितले आहे. जर तो भाजपमध्ये आला तर त्यामध्ये विशेष असे काही नाही, असे हा नेता म्हणाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former union minister sanjay paswan says ms dhoni may join bjp after his retirement from cricket