पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन

जयपाल रेड्डी (HT Photo)

यूपीए सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री राहिलेले काँग्रेसचे नेते जयपाल रेड्डी (वय ७७) यांचे हैदराबाद येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते असे सांगण्यात येते. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले आणि एक मुलगी आहे.

जयपाल रेड्डी हे यूपीए सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा पदभार सांभाळला होता. १६ जानेवारी १९४२ मध्ये हैदराबादमधील मदगुल येथे जन्मलेले जयपाल रेड्डी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत ते चेवेल्ला मतदारसंघातून निवडून आले होते. यापूर्वी ते १९९८ मध्ये माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री होते. 

जयपाल रेड्डी हे १९६९ ते १९८४ या काळात आंध्र प्रदेशमधील कलवाकुर्ती येथून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी काँग्रेस सोडून  जनता पार्टीत सामील झाले होते. १९९९ मध्ये ते २१ वर्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये आले. ते यूपीएच्या दोन्ही कार्यकाळात केंद्रीय मंत्री होते.