पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मुलाचा भाजपत प्रवेश

नीरज शेखर यांचा भाजपत प्रवेश

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मुलगा आणि समाजवादी पक्षाचे नेते नीरज शेखर यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कालच त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मंगळवारी दुपारी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंदर यादव हे यावेळी उपस्थित होते. 

... या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या व्याजदरात कपात

लोकसभा निवडणुकीत नीरज शेखर बलिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासूनच ते नाराज होते, अशी माहिती एका नेत्याने दिली.

नीरज शेखर यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेतील समाजवादी पक्षाची सदस्य संख्या १२ पर्यंत खाली आली आहे. सध्या राज्यसभेमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजेच ७८ खासदार आहेत. नीरज शेखर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर पोटनिवडणूक होईल. त्यानंतर भाजपची सदस्यसंख्या एकने वाढणार आहे.