पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रणव मुखर्जींना ८ ऑगस्टला प्रदान करणार भारतरत्न

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ८ ऑगस्ट रोजी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला जाणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्नची घोषणा केली होती. 

भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मोदी सरकारने ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी २०१९ ला भारतीय जनसंघाचे विचारक आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक नानाजी देशमुख, प्रसिद्ध आसामी कवी, गायक, संगीतकार भूपेन हजारिका आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर केला होता.

आम्ही संत-मुनींची संतती, माकडांची नव्हेः भाजप खासदार सत्यपाल सिंह

नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना हा सन्मान मरणोत्तर दिला जाणार आहे. हा सर्वोच्च नागरी सन्मान अखेरच्या वेळी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) देण्यात आला होता. आतापर्यंत ४५ सन्माननीय व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २५ जानेवारी २०१९ च्या घोषणेनंतर ही संख्या ४८ झाली आहे.

प्रणव मुखर्जींना भेटणे हा नेहमीच समृद्ध करणारा अनुभव - मोदी

प्रणव मुखर्जी यांचा २०१७ मध्ये राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपला होता. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच सर्वांनांच आश्चर्याचा धक्का बसला होता. राष्ट्रपतीच्या कार्यकाळात त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध होते. 

पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा आधीच्या सरकारांमुळेच शक्य - प्रणव मुखर्जी

मुखर्जी यांनी मागीलवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर वाद उत्पन्न झाला होता.