पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ‘भारतरत्न’ पुरस्कारानं सन्मानित

भारत रत्न पुरस्कार प्रदान सोहळा

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रणब मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

या पुरस्कार सोहळ्यास पंतप्रधान मोदींसह अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती. देशाचा सर्वोच्च नागरी किताबानं सन्मानित करण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी  प्रणब मुखर्जी यांनी शुभेच्छा दिल्या. प्रणब मुखर्जी  भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांच्या पंतप्रधानांसोबत मिळून काम केलं आहे. काँग्रेस आणि सरकारमध्ये विविध पदे भूषवताना मुखर्जींनी नेहमीच संघ आणि भाजपच्या अनेक भूमिका, धोरणांवर मुक्तपणे टीका केली होती. असं असलं तरी पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबध होते.

प्रणब मुखर्जी यांच्यासोबतच दिवंगत समाजसेवक नानाजी देशमुख आणि दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका  यांच्या वतीनं त्यांचा मुलगा तेज  हजारिका यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भूपेन हजारिका यांनी आसामी चित्रपट सृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं. भूपेन हजारिका यांनी संगीतकार, गायक आणि एक उत्तम दिग्दर्शक म्हणून आसाममध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आसामी भाषेबरोबरच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांनाही संगीत दिलं. चित्रपटसृष्टीतील मोलाच्या योगदानासाठी त्यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’नं  सन्मानित करण्यात आलं होतं. २०११ साली  त्यांचं निधन झालं. 

तर दिवंगत समाजसेवक नानाजी देशमुख यांच्या वतीनं दिनदयाळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष विजेंद्रजित सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला. नानाजी देशमुख यांनी राजकारणानंतर ग्रामीण  भारताला स्वयंपूर्ण करण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. शिक्षण आणि भारतीय संस्कृती यांच्या प्रसारात त्यांनी मोलाचं योगदान  दिलं. २०१०मध्ये वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.