पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर पाठवण्याचे काँग्रेससमोर आव्हान

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेससमोर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना राज्यसभेवर पाठवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. ते आसाममधून राज्यसभेवर निवडून आलेले आहेत. त्यांचा कार्यकाळ १४ जून रोजी संपणार आहे. आसाममधून राज्यसभा जिंकणे आता सोप्पे राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना राज्यसभेसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

शेतकरी, युवक आणि व्यापाऱ्यांसाठी मोदी सरकार विनाशकारी- मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग आणि एस कुजूर यांचा कार्यकाळ १४ जून रोजी संपणार आहे. दोन्ही जागांसाठी ७ जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने याची अधिसूचना जारी केली आहे. आसाम विधानसभेत १२६ जागा आहेत. सध्या काँग्रेसकडे २६ जागा आहेत. राज्यात एआययूडीएफकडे १३ जागा आहेत. एआययूडीएफने मदत केली तरी काँग्रेसला विजय मिळवणे सोप्पे नाही. 

काँग्रेसकडे दोन पर्याय

काँग्रेसकडे सध्या दोन पर्याय उपलब्ध आहेत. काँग्रेसने त्यांची सत्ता असलेल्या एखाद्या राज्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवणे हा त्यांचासमोर पहिला पर्याय आहे. नाहीतर जुलैपर्यंत वाट पाहून द्रमुकच्या मदतीने राज्यसभेवर पाठवण्याच दुसरा पर्याय त्यांच्यासमोर आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अनेक राज्यसभा सदस्यांनी निवडणूक लढवली होती. पक्षाला मध्य प्रदेशमधील जागा रिकामी झाल्यानंतर पोटनिवडणुकीत राज्यसभा निवडणूक जिंकता येईल अशी पक्षाला अपेक्षा होती. पण कोणताही राज्यसभा सदस्य निवडणूक जिंकू शकला नाही.

२०१४ पूर्वीही अनेक सर्जिकल स्ट्राईक, पण जाहिरात नाही केली - मनमोहन सिंग

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी पुढीलवर्षी एप्रिल महिन्यात निवडणुका होणार आहेत. पक्षासमोर हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. यामध्ये काँग्रेसशासित राज्यांमधील फक्त ६ जागा रिकाम्या आहेत. मध्य प्रदेशमधील ३, राजस्थानमधील १ आणि छत्तीसगडमधील १ जागा आहे. तर काँग्रेसला ओडिशा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि गुजरातमधील आपल्या राज्यसभेच्या जागा गमवाव्या लागू शकतात. कारण ओडिशा, आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली राहिलेली नाही.