पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनमोहन सिंग यांची राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राजस्थानमधून ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. रविवारी राजस्थानमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मंगळवारी मनमोहन सिंग यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी भाजपच्या एकाही उमेदवाराने त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. राजस्थानमधील भाजपचे राज्यसभा सदस्य मदन लाल सैनी यांचे जूनमध्ये निधन झाले होते. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.

'आरोपांमध्ये तथ्य नसल्यास राज ठाकरेंना सोडलं जाईल'

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करुन सांगितले की, 'मी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्यामुळे अभिनंदन करतो. मनमोहन सिंग यांची निवड संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या ज्ञान आणि अनुभवातून राजस्थानच्या लोकांना खूप फायदा होईल.'

J&K मधील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर डोवाल यांनी घेतली 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंग जवळपास तीन दशकापासून आसाममधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. ते १९९१ ते २०१९ या कालावधीत लागोपाठ ५ वेळा राज्यसभा सदस्य राहिले. तर २००४ ते २०१४ पर्यंत ते दोन वेळा देशाचे पंतप्रधान झाले. 

सेहवागच्या फोटोवरुन नेटकऱ्यांनी साधला पाकवर निशाणा