पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्याने भारतात मागितले शरण

बलदेव कुमार (ANI)

नवीन पाकिस्तान बनवण्याचा दावा करणारे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्याच नेत्याने स्वतःला असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या आरक्षित जागेवरुन यापूर्वी निवडून आलेले तहरिक ए इन्साफचे बलदेवकुमार सध्या भारतात आहेत. त्यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असुरक्षित असल्याचे सांगत आपण परत जाऊ इच्छित नसल्याचे ते म्हटले आहे. त्यांनी भारत सरकारकडे शरण देण्याची विनंती केली आहे. 

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांसाठी असुरक्षित वातावरण असल्याचा दावा करताना ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये फक्त अल्पसंख्यांकच नव्हे तर स्वतः मुसलमानही सुरक्षित नाहीत. आम्हाला पाकिस्तानमध्ये मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मी भारत सरकारला विनंती करतो की, त्यांनी मला या देशात शरण द्यावे. मी पाकिस्तानला परत जाणार नाही. 

पाकिस्तानातील हिंदू आणि शिख अल्पसंख्यांक भारतात यावेत यासाठी मोदी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी अल्पसंख्याकांचा छळ केला जात असल्याचे म्हटले.

तयारी विधानसभेची!, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक मुलींचे अपहरण करुण त्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यासारख्या घटना घडत आहेत. एका स्थानिक माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, २००७ मध्ये बलदेवकुमार यांनी पंजाबमधील खन्ना येथे राहणाऱ्या एका महिलेशी विवाह केला होता. सध्या ते खन्ना येथेच आपल्या कुटुंबाबरोबर राहत आहेत. बलदेव तीन महिन्यांच्या व्हिसावर भारतात पोहोचले आहे. ते खैबर पख्तनूवा परिसरात अल्पसंख्यांकाच्या अधिकारासाठी आवाज उठवत आले आहेत. ते इम्रान खान यांच्या पक्षाकडून एकदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत.

एका माध्यम समूहाशी बोलताना बलदेवकुमार म्हणाले की, पाकिस्तानच्या इतर जनतेप्रमाणे मलाही इम्रान खान यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण आम्हाला निराश करण्यात आले. पाकिस्तानमध्ये सध्या खूप असुरक्षितता आहे. अशा परिस्थितीत मी परत जाऊ इच्छित नाही. 

चांद्रयान २ : विक्रम लँडरसंदर्भात इस्रोने जारी केली नवी माहिती