पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपत शिवराजसिंह यांच्याकडे मोठी जबाबदारी

शिवराजसिंह चौहान

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते शिवराजसिंह चौहान यांच्यावर पक्षान मोठी जबाबदारी सोपवली आहे. शिवराजसिंह यांना पक्षाच्या राष्ट्रीय सदस्यता अभियान प्रमुख बनवण्यात आले आहे. शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात भाजप सदस्यता अभियान राबवणार आहे.

गुरुवारी दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकारी आणि राज्य प्रमुखांच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिवराजसिंह यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. जिथे पक्ष अजूनही कमकुवत आहे. अशा राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना अमित शहा यांनी दिली आहे. या जबाबदारीमुळे शिवराजसिंह हे पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आले आहेत.

दरम्यान, शिवराजसिंह यांना राष्ट्रीय राजकारणात जाण्याची इच्छा नसल्याचे बोलले जात आहे. त्यांना राज्यात राहून पक्ष मजबूत करायचा आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रीय स्तरावर शिवराज यांची महत्वाची भूमिका राहिल, हे नव्या जबाबदारीवरुन स्पष्ट होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former madhya pradesh chief minister shivraj singh chouhan likely to lead the bjp membership drive