पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन

माजी फुटबॉलपटू आणि रणजी क्रिकेटर चुन्नी गोस्वामी (संग्रहित छायाचित्र)

भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चुन्नी गोस्वामी यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारीय फुटबॉल संघाने १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. बंगाल क्रिकेट संघाकडून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले होते. चुन्नी यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. अनेक दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजता त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घातला.  

दिलासादायक! कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर

बॉलिवडू क्षेत्रातील अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांच्या निधनाच्या घटनेला चोवीस तास उलटण्यापूर्वी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ऋषी कपूर यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकले होते. या दुखातून देश सावरत नाही तोपर्यंत आता क्रीडा क्षेत्रात मैदानात गाजवलेल्या चुन्नी गोस्वामी यांचे निधन झाल्याचे वृत्त आले. कोरोना विषाणूच्या संकटात दिग्गजांच्या निधनामुळ चाहत्या वर्गांला या मंडळीचे अखेरचे दर्शनही नशीबी आले नाही, हे एक दुर्देवच म्हणावे लागेल.  

दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
 
गोस्वामी यांनी १९५७  मध्ये फुटबॉल खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय मैदानात पाउल टाकले होते. फारच कमी वेळेत त्यांनी भारतीय संघातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये आपले स्थान मिळवले. १९६४   मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. या सामन्यात भारताला यश मिळाले नाही. याच वर्षी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गोस्वामी यांनी आंतरराष्ट्रीय मैदानातून निवृत्ती जाही केली. फुटबॉलला रामराम केल्यानंतर गोस्वामी यांनी क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केली. १९६६ मध्ये त्यांनी सुब्रतो गुहा यांच्यासह विक्रमी कामगिरी करत गॅरी सोबर्स यांच्या वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला होता. या सामन्यात गोस्वामी यांनी ८ बळी टिपले होते. १९७१-७२ मध्ये रणजी हंगामात गोस्वामी यांनी बंगाल संघाचे नेतृत्व केले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former Indian footballer Chuni Goswami passes away due to cardiac arrest in Kolkata West Bengal