पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐन निवडणुकीत हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का

अशोक तन्वर

ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हरियाणामधील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा शनिवारी राजीनामा दिला. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश निवडणूक समितीचाही राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी निवडणूक समितीतील सदस्यांवर पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केला होता.

अनंतनागमध्ये उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला, ८ जण जखमी

अशोक तन्वर यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर, सामान्य जनतेला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना माहिती असलेल्या कारणांमुळे मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो आहे. या ट्विटसोबत त्यांनी चार पानी राजीनामापत्रही जोडले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिले आहे.

पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस सध्या अवघड परिस्थितीतून जात आहे. याला कारण अर्थात बाहेरील कोणीही नसून, पक्षाच्या अंतर्गत कारभारामुळेच ही वेळ ओढावली आहे. खूप दिवस विचार केल्यानंतर मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनाम देतो आहे. माझा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही तर व्यवस्थेविरोधात आहे. याच व्यवस्थेमुळे देशातील सर्वात जुन्या पक्षावर आज ही वेळ ओढवली आहे, असेही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये लिहिले आहे.

अमेरिकेच्या व्हिसा नियमात बदल, अनेक भारतीयांना फटका बसणार

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपानंतर अशोक तन्वर यांनी बुधवारी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनही केले होते.