पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रपतींनी एम्समध्ये घेतली अरूण जेटलींची भेट

अरूण जेटली

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जेटलीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. अरुण जेटली यांना ९ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना श्वसनास त्रास होत असून आणि अस्वस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; धनराज महालेंची घरवापसी

गेल्या ७ दिवसांपासून अरुण जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. आता त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ९ ऑगस्ट रोजी त्यांच्या प्रकृतीसंदर्भात रुग्णालयाकडून एक बुलेटिन जारी करण्यात आले होते. त्यानंतर एम्स प्रशासनाकडून अरुण जेटली यांच्या प्रकृतीविषयी काहीच माहिती सांगण्यात आली नाही.

काश्मीरमधील स्थिती सुधारेल, थोडा धीर धरा; केंद्राचा कोर्टात युक्तिवाद 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, अरुण जेटली यांना मधुमेहाचा त्रास आहे आणि त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट देखील झाले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तसंच त्यांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक सर्जरी केली होती. 

विधानसभा निवडणूक : ३० ते ४० टक्के मंत्र्यांना भाजप उमेदवारी 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former finance minister arun jaitley in critical condition president ramnath kovind visit aiims