पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरुण जेटलींना एम्समध्ये केले दाखल; मोदींसह भाजप नेत्यांनी घेतली भेट

अरूण जेटली

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून आजारी असणाऱ्या अरुण जेटली यांना आज श्वसनास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या एका टीमच्या नियंत्रणाखाली त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, रात्री साडेदहा वाजता एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी केले जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे 29 जणांचा मृत्यू; 6 बेपत्ता

अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन एम्समध्ये दाखल झाले. त्यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे एम्समध्ये पोहचले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेटलींची विचारपूस करण्यासाठी एम्स रुग्णालयात दाखल झाले. अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन काही वेळातच मोदी एम्समधून निघून गेले.

केरळमध्ये पूरबळींची संख्या 28 वर; कोची विमानतळ बंद

गेल्या अनेक वर्षापासून अरुण जेटली आजारी आहेत. ते मोदी सरकार 1 मध्ये असतानाच त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. अमेरिकेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सतत प्रकृती बिघड असल्यामुळे त्यांनी मोदी सरकार 2 च्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. याबात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते.

जम्मूमध्ये जमावबंदी हटवली; उद्यापासून शाळा होणार सुरु