पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराजांच्या पार्थिवावर 3 वाजता होणार अंत्यसंस्कार

सुषमा स्वराज

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्या ६७ वर्षांच्या होत्या. छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्यांना साडेनऊ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. आज दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन

सुषमा स्वराज या भाजपच्या धडाडीच्या नेत्या होत्या. त्या वयाचे 49 वर्ष राजकारणामध्ये सक्रीय राहिल्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृतीत बिघाड होत असल्यामुळे त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्या गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून दूर होत्या. सुषमा स्वाराज यांच्या अचानक झालेल्या दु:खद निधनामुळे भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. 

सुषमा स्वराज यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर

दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी कळताच गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री एम्स रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. सुषम स्वराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी 11 वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तर दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर लोधी रोड स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

विधयेक संमत होताच मोदी म्हणाले, एक नवी सकाळ वाट पाहत आहे