पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या पीएची आत्महत्या

रमेश

प्राप्तीकर विभागाच्या छाप्यांमुळे सध्या चर्चेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या स्वीय सहायकाने बेंगळुरुत आत्महत्या केली आहे. रमेश असे आत्महत्या केलेल्या स्वीय सहायकाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही.

वर्धा : पंतप्रधानांना सामूहिक पत्र लिहिणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचे निलंबन

दोन दिवसांपूर्वी जी परमेश्वर यांच्या घर, कार्यालय, शैक्षणिक संस्थां आदी ३० ठिकाणी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले होते. दोन दिवस चाललेल्या या शोध मोहिमेत सुमारे कोटी रुपयांची रोकड प्राप्ती विभागाला मिळून आली होती. 

VIDEO : किनाऱ्यावरील कचरा गोळा करून मोदींनी दिला स्वच्छता संदेश

परमेश्वर यांचे स्वीय सहायक रमेश यांनी आत्महत्या केल्याचे शनिवारी आढळून आले. रमेश यांनी गण भारती परिसरात आत्महत्या केली. रमेश यांनी आत्महत्या का केली, प्राप्तीकर विभागाच्या छाप्याशी त्यांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, त्यांच्यावर दबाव होता का, यासंबंधीचा तपास पोलिस करत आहेत.

..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former Deputy CM of Karnataka G Parameshwaras Personal Assistant has allegedly committed suicide