पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रंजन गोगोईंनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ, विरोधकांचा सभात्याग

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. रंजन गोगोई यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. गुरुवारी याच विरोधाचा भाग म्हणून काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांनी शपथविधीवेळी सभात्याग केला. कम्युनिस्ट पक्ष, डीएमके आणि एमडीएमकेनेही या नियुक्तीला विरोध केला आहे.

चीनमध्ये कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या गेल्या २४ तासांत शून्यावर

नोव्हेंबर २०१९ मध्ये रंजन गोगोई देशाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर १६ मार्चला त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. राज्यसभेमध्ये त्यांना १३१ क्रमांकाचा आसन क्रमांक देण्यात आला आहे. 

कोरोना विषाणू कृत्रिमपणे तयार केला नसून नैसर्गिकच - शास्त्रज्ञ

रंजन गोगोई यांच्या नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीशांनी टीका केली होती. माजी न्यायाधीश मदन लोकूर, ए के पटनाईक, कुरिअन जोसेफ यांनी या नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी स्वतः रंजन गोगोई यांनी आपल्या नियुक्तीचे समर्थन केले आहे. कायदे मंडळ आणि न्याय मंडळाने यांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे, यासाठीच मी ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे रंजन गोगोई यांनी सांगितले.