पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विमान वाहतूक घोटाळाः प्रफुल्ल पटेल यांची ईडीच्या चौकशीला गैरहजेरी

प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी विमान उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल हे विमान वाहतूक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बोलावलेल्या चौकशीला गैरहजर राहिले आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण चौकशीस हजर राहू शकत नाही. त्यामुळे आपण ईडीला पुढील तारीख मागितल्याचे पटेल यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले आहे.

ईडीने याप्रकरणी १ जून रोजी पटेल यांना समन्स पाठवले होते. पटेल त्यावेळी मुंबई येथे आयोजित पक्षाच्या बैठकीत उपस्थितीत होते. ज्यावेळी पटेल यांनी ईडीच्या समन्सबाबत माहीत झाले त्यांनी त्वरीत बैठक सोडून दिली होती. त्याचबरोबर त्यांनी चौकशीत ईडीला सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, नियोजनाप्रमाणे आज चौकशीचा वेळ असताना. पटेल आणि आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमाचा दाखला देत ईडीकडे पुढील तारीख मागितली आहे. 

विमान वाहतूक घोटाळाः राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना ईडीचे समन्स

दरम्यान, पटेल यांचा निकटवर्तीय उद्योग सल्लागार दीपक तलवार याच्यावर प्राप्तिकर कार्यालयाने गुन्हे दाखल केले आहेत. स्वत:च्या तसेच कुटुंबीयांच्या बँक खात्यांत शेकडो कोटी रुपयांची रक्कम अवैधपणे जमा केल्याचा तलवारवर आरोप आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने ३ आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८-०९ या काळात २७२ कोटी रुपये मिळाल्याचा दावा ईडीने केला होता. चौकशीपासून वाचण्यासाठी तलवार देश सोडून पळाला होता. त्यानंतर त्यांचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. 

आर्थिक स्थिती नसताना ७० हजार कोटी रुपये किंमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे याचा ईडीकडून तपास सुरु आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former Civil Aviation Minister and NCP leader Praful Patel to not appear before the Enforcement Directorate today