पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावित्रीबाई फुलेंनी सोडला काँग्रेसचा हात; स्वत:चा पक्ष स्थापन करणार

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपला सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या सावित्रीबाई फुले यांनी एका वर्षातच काँग्रेसचा हात सोडला आहे. सावित्रीबाई यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिला असून स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली.

आता ग्रामविकास, कृषी किंवा सहकारपैकी एक खाते काँग्रेसला हवे

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले यांनी आरोप केला आहे की, 'माझा आवाज पक्षात ऐकला जात नाही. म्हणून मी राजीनामा देत आहे. मी माझा स्वत: चा पक्ष स्थापन करणार आहे.' दरम्यान, बहराइच मतदार संघाच्या भाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी ६ डिसेंबर २०१८ रोजी लखनऊ येथे भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्या काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. 

RSSचे PM भारतमातेशी खोटं बोलत आहेत, राहुल गांधींचा टोला

बहराइचच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी २०१२ मध्ये भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढली. यामध्ये विजयी होऊन त्या खासदार झाल्या. भाजपचे खासदार असताना त्यांनी पक्षामध्ये आवजा दाबला जात असल्याचे सांगत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

...म्हणून सरकार चालवण्यासाठी कसरत करावी लागते: फडणवीस