तेलुगू देशम पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव (वय ७२) यांनी गळफास घेऊन आत्म्हत्या केल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. उपचारासाठी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता त्यांना सोमवारी दुपारी मृत घोषित करण्यात आले.
कोडेला शिवप्रसाद यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना त्वरीत बंजारा हिल येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यात अपयश आले. दुपारी १२.१५ वाजता त्यांनी मृत घोषित करण्यात आले.
Former Andhra Pradesh Speaker, Kodela Siva Prasada Rao commits suicide by hanging himself at his residence in Hyderabad. pic.twitter.com/BXcKBAmUZ1
— ANI (@ANI) September 16, 2019
कोडेला यांच्यामागे पत्नी शशिकला, मुलगा शिवराम आणि मुलगी विजयालक्ष्मी आहे. त्यांच्या धाकट्या मुलाचा काही वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला आहे.
गुलाम नबी आझाद कुटुंबीयांची घेणार भेट; सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी
कोडेला हे सहा वेळा खासदार होते. विभाजनानंतर ते आंध्र प्रदेशचे पहिले विधानसभा अध्यक्ष झाले होते. ते १९८५ मध्ये माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या कॅबिनेटमध्ये गृहमंत्रीही होते. चंद्राबाबू नायडू यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी अनेक मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली होती.
आंध्रमध्ये जगनमोहन रेड्डी यांचे सरकार सत्तेवर येताच कोडेला यांचा मुलगा आणि मुलीवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार कोडेला यांच्यावर विधानसभा अध्यक्ष असताना सभागृहातील टेबल-खुर्च्या मुलाच्या शोरुममध्ये पोहोचवल्याचा आरोप आहे.