पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच बालाकोट एअर स्ट्राइकः माजी हवाई दलप्रमुख

बी एस धनाओ

भारतावरील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल हे पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांना समजावे यासाठीच बालाकोट हवाई हल्ला करण्यात आला होता, अशी माहिती भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख बी एस धनाओ यांनी दिली. अत्यंत प्रभावी पद्धतीने शेजारी देशाला हा संदेश देण्यात आला, असेही ते म्हणाले.

पंजाब सरकार आणि चंदिगड प्रशासनाकडून संयुक्तरित्या आयोजित सैन्य साहित्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'अंडरस्टँडिंग द मेसेज ऑफ बालाकोट' या विषयावरील चर्चेत धनाओ बोलत होते.

धनाओ म्हणाले की, आमच्याकडून काही मुर्खासारख्या चुका झाल्या. त्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्या. त्याचबरोबर यासाठी जबाबदार लोकांना शिक्षाही दिली जाईल. मात्र, या चुका काय होत्या, याची विस्तृत माहिती त्यांनी दिली नाही. ते हेही म्हणाले की, आम्ही २७ फेब्रुवारीला (जेव्हा पाकिस्तान हवाई दलाने बालाकोट हल्ल्याच्या एक दिवसानंतर उत्तरादाखल कारवाई केली) पाकिस्तानी सैन्याविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करु शकलो नाही. 

फडणवीसांच्या त्या शपथविधीनंतर 'शॉक' बसलाः पंकजा मुंडे

भारताने मोठ्या प्रमाणात हानी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना चोख उत्तर दिले. मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि २००८ मध्ये मुंबईतच झालेला दहशतवादी हल्ल्यावेळी भारताकडून कोणतीही लष्करी कारवाई करण्यात आली नाही, हे त्यांनी जोर देऊन सांगितले.

हवाईदल प्रमुख पदावरुन ३० सप्टेंबरला निवृत्त झालेले धनाओ म्हणाले की, उरीमध्ये २०१६ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने पहिल्यांदा प्रत्युत्तर दिले आणि पीओकेमधील दहशतवादी तळ नष्ट केले. 

'राहुल यांच्यासाठी 'जिना' हेच आडनाव उपयुक्त', भाजप आक्रमक
 
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला याचा बदला घेण्यात येईल याची भीती बसली होती. या हल्ल्यात ४० लोक मारले गेले होते.
 
सरकार आणि राजकीय इच्छाशक्ती स्पष्ट होती. जैश ए मोहम्मद आणि इतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना अशा हल्ल्यांची त्यांना किंमत चुकवावी लागेल, हे सांगायचे होते. मग तो पीओकेमधील भाग असेल किंवा पाकिस्तान. आम्ही तुम्हाला मारणार, हाच बालाकोटचा संदेश आहे, असेही ते म्हणाले.

फारुख अब्दुल्लांच्या नजरकैदेत आणखी ३ महिन्यांची वाढ