पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅमेझॉनच्या वर्षावनात भीषण आग, अवकाशातूनही दिसतोय धूर

अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉनचं वर्षावन हे तिथल्या जैवविविधतेसाठी जगप्रसिद्ध आहे. पशू-पक्षी, वनस्पतीच्या हजारो प्रजाती या वर्षावनात आढळतात. जगात क्वचितच  आढळेल अशी जैवसंपदा  अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आहे. मात्र अ‍ॅमेझॉनचं जंगल सध्या भीषण आगीनं  धुमसतंय.  ट्विटरवर #PrayForTheAmazon हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ब्राझील देशात येणाऱ्या जंगलाच्या सर्वाधिक भागात ऑगस्टपर्यंत आगीच्या ७५ हजार घटनांची नोंद झाली असल्याचं नॅशनल इन्स्टिट्यूड  फॉर स्पेस रिसर्चनं म्हटलं आहे. 

कलम ३७० वरुन लक्ष विचलित करण्यासाठी अटक: कार्ती चिदंबरम

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत ३९, ७५९ आगीच्या घटनांची नोंद झाली होती. म्हणजे आगीच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचं नॅशनल इन्स्टिट्यूड  फॉर स्पेस रिसर्चनं निदर्शनास आणून दिलं आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आगीचं वाढतं प्रमाण ही चिंतेची बाब असल्याचं  त्यांनी म्हटलं आहे. अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठं वर्षावन आहे. या वर्षावनाचा सर्वाधिक भाग हा बाझील देशात आहे त्यानंतर  पेरू, कोलंबिया, व्हेनेझ्युएला, इक्वेडोअर, बोलिविया  सुरूनेम यांसारख्या देशांत या वर्षावनाचा भाग आहे. 

मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान आणि दादर परिसरात जमावबंदी लागू

साधरण ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या काळात या जंगलात वणवा लागण्याचा प्रकार घडतो, किंवा शेतीसाठी अनेकदा तण, सुका पालापाचोळाही जाळला जातो. त्यामुळेही आग लागते, ही आग जंगलात पसरते. यावर्षी आगीच्या अनेक घटना वृक्षतोडीमुळेही घडल्या आहेत.

 

अ‍ॅमेझॉनच्या वर्षावनात येत्या तीन महिन्यात सरासरीपेक्षाही कमी पर्जन्यमान असेन अशीही भीती नॅशनल इन्स्टिट्यूड  फॉर स्पेस रिसर्चनं व्यक्त केली आहे.