पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी-जिनपिंग बैठकः भारताचे कूटनीतिक यश, काश्मीरवर चकार शब्द नाही

मोदी-जिनपिंग बैठकः भारताचे कूटनीतिक यश, काश्मीरवर चकार शब्द नाही

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान काश्मीर मुद्द्यावर एकदाही चर्चा झाली नाही. परंतु, दहशतवादावर दोघांमध्ये विस्ताराने चर्चा झाली. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दोन्ही नेत्यांबरोबर चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. दोन्ही नेत्यांच्या चर्चेत काश्मीरचा मुद्दा न येणे हा भारताचा कुटनीतिक विजय मानला जात आहे. यापूर्वी काश्मीर मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमधील चर्चा भरकटू शकते अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. कारण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबरील चर्चेनंतर चीनने काश्मीरवर यूएन चार्टरची मागणी केली होती. त्यामुळे या शक्यतेला बळ मिळाले होते.  

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या पीएची आत्महत्या

विजय गोखले म्हणाले की, दोन्ही नेत्यांच्या प्रदीर्घ चर्चेत एकदाही काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली नाही. दोन्ही देशांनी दहशतवादाचा एकत्रित सामना करण्याबाबतही चर्चा केली होती. त्याचबरोबर काश्मीर मुद्दा हा अतंर्गत आहे, असे भारताने म्हटले होते. 

दरम्यान भारताने यापूर्वीही काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले होते. अशात ते या मुद्द्यावर चिनी नेत्याशी चर्चा करणार नाहीत, असे निश्चित करण्यात आले होते. कोणत्याही स्थितीत आमचा हेतू स्पष्ट आहे. कारण काश्मीर संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे, असे गोखले म्हणाले.

ते म्हणाले की, दहशतवाद आणि कट्टरवाद्यांच्या आव्हानाचा सामना करणे गरजेचे आहे, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देश केवळ क्षेत्रफळाच्या हिशोबानेच नव्हे तर लोकसंख्येच्या दृष्टीनेही खूप मोठे आहेत. 

वर्धा : पंतप्रधानांना सामूहिक पत्र लिहिणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचे निलंबन

दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ९० मिनिटांपर्यंत चर्चा झाली. त्यानंतर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले. या परिषदेत दोन्ही नेत्यांची एकूण ६ तासांपर्यंत बैठक झाली. 

सलग १२ व्या वर्षी मुकेश अंबानी भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत

गोखले म्हणाले की, व्यापार, गुंतवणूक आणि सेवांवर चर्चा करण्यासाठी नवीन व्यवस्थेची स्थापना केली जाईल. यामध्ये चीनकडून उपपंतप्रधान हू शुन्हुआ आणि भारताकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी होतील. 

जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना चीनला येण्याचे आमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. यानंतरची बैठक चीनमध्ये होईल. तारखेची घोषणा दोन्ही नेत्यांच्या सुविधेच्या हिशोबाने केली जाईल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Foreign Secretary Vijay Gokhale Kashmir issue was not raised and not discussed Our position is anyways very clear that this is an internal matter of India