पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेहरु-पटेल कॅबिनेटवरुन परराष्ट्र मंत्री जयशंकर-रामचंद्र गुहा आमनेसामने

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि रामचंद्र गुहा

माजी परराष्ट्र सचिव आणि विद्यमान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यात सध्या 'टि्वटर वॉर' सुरु आहे. जयशंकर यांनी व्ही पी मेनन यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. हे आत्मचरित्र नारायणी बसू यांनी लिहिले आहे. त्यांनी या पुस्तकाच्या हवाल्याने टि्वट केले की, नेहरु १९४७ मध्ये वल्लभभाई पटेल यांना कॅबिनेटमध्ये घेऊ इच्छित नव्हते आणि त्यांनी कॅबिनेटच्या सुरुवातीच्या यादीतून त्यांचे नाव हटवले होते. 

जयशंकर यांच्या टि्वटला उत्तर देताना इतिहासकार रामचंद्र गुहा समोर आले आणि त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, हे एक मिथ्यक आहे, जे प्रोफेसर श्रीनाथ राघवन विस्तारपूर्वक लेख लिहून खोटे सिद्ध केले आहे. फेक न्यूज आणि आधुनिक भारताच्या दोन निर्मात्यांमधील शत्रुत्वाच्या खोट्या बातम्या पसरवणे हे परराष्ट्र मंत्र्याचे काम नाही. तुम्ही या गोष्टी भाजप आयटी सेलसाठी सोडून दिल्या पाहिजेत, असा टोला लगावला. 

पण एकमेकांवर शाब्दिक वार करण्याचा क्रम इथेच संपला नाही. जयशंकर यांनी रामचंद्र गुहा यांना उत्तर देताना म्हटले की, काही परराष्ट्र मंत्री पुस्तकेही वाचतात. हे ही असू शकते की काही प्रोफेसर यांनाही ही चांगली सवय असेल. जर असे असेल तर मी त्यांना सल्ला देतो की, ते पुस्तकं वाचा, ज्याचं मी काल प्रकाशन केलंय.

रामचंद्र गुहा यांनी त्याचं उत्तर देत लिहिलं की, सर तुम्ही जेएनयूमधून पीएचडी केली आहे. हे निश्चित आहे की, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पुस्तकं वाचली असतील. त्यात नेहरु आणि पटेल यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारावर प्रकाशित सामग्रीही असतील, ज्यात नेहरु कशा पद्धतीने पटेल यांना आपल्या कॅबिनेटमधील मजबूत स्तंभ म्हणून पाहत असत. ती पुस्तकं पुन्हा एकदा वाचा.

यापूर्वी जयशंकर यांनी म्हटले की, हे पुस्तक नेहरु के मेनन आणि पटेल के मेनन यांच्यादरम्यानचे अंतर सांगते. नारायणी बसू द्वारा लिखित पुस्तकाच्या माध्यमातून एक वास्तविक ऐतिहासिक व्यक्तीबरोबर बहुप्रतीक्षित न्याय केला गेला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Foreign Minister Jaishankar and Ramchandra Guha face to face on nehru did not want Patel in his cabinet