पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकमधून अजून एक ड्रोन पंजाबमध्ये घुसल्याने सुरक्षाव्यवस्था आणखी सतर्क

सुरक्षा व्यवस्था सतर्क

पंजाबमध्ये हुसैनीवाला भागात पाकिस्तानी सीमेजवळ एक ड्रोन सोमवारी रात्री भारतीय हद्दीत घुसताना आढळल्याने सुरक्षा व्यवस्था आणखी सतर्क झाली. काही दिवसांपूर्वीच ८० किलो वजनाची शस्त्रे आणि दारुगोळा घेऊन ड्रोन भारताच्या हद्दीत आल्याचे तपासात आढळून आले होते. त्यानंतर आता परत एकदा एक ड्रोन भारतीय हद्दीत येताना दिसल्याने या परिसरातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.

२८८ जागा आणि ३२३९ उमेदवार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार

लष्करातील एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, सोमवारी रात्री दहा ते दहा वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान हुसैनीवाला भागामध्ये पाकिस्तानच्या हद्दीत एक ड्रोन पाच वेळा दिसले. यापैकी एकदा ते भारतीय हद्दीत शिरतानाही दिसून आले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना हे ड्रोन दिसले होते. चार वेळा हे ड्रोन पाकिस्तानी हद्दीत घिरट्या घालत असल्याचे दिसून आले होते.

 

'मन की बात'चे 'मौन की बात' होऊ देऊ नका, शशी थरूर यांचे मोदींना पत्र

भारतीय हद्दीत साधारणपणे एक किलोमीटरपर्यंत हे ड्रोन आतल्या बाजूला आले होते. पण नंतर ते परत पाकिस्तानी हद्दीत जाताना दिसले. पाकिस्तानी हद्दीत गेल्यानंतर या ड्रोनवरील दिवे बंद झाल्याने आणि त्याचा आवाजही ऐकू न आल्याने पुढे ते कुठे गेले हे समजू शकले नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी याबद्दल पंजाब पोलिसांना माहिती दिली असून, पंजाब पोलिस पुढील तपास करीत आहेत. ९ ते १६ सप्टेंबर या काळात खलिस्तान झिंदाबाद फोर्सच्या साह्याने पंजाबमध्ये ८० किलो वजनाची शस्त्रे आणि दारुगोळा पाठविण्यात आला होता, असे यापूर्वीच तपासात उघड झाले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून ही शस्त्रे आणि दारूगोळा पाठविल्याचे भारतीय तपास संस्थांनी सांगितले.

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळ, SPG सुरक्षा काढण्याची चर्चा