पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हाऊडी मोदी' कोलमडलेली आर्थिक स्थिती लपवू शकणार नाही, राहुल गांधींची मोदींवर टीका

राहुल गांधी

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी विविध घोषणा केल्या. यामध्ये प्रामुख्याने कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयावर राहुल गांधी यांनी टीका केली. ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भारताची कोलमडलेली आर्थिक स्थिती कोणताही कार्यक्रम लपवू शकणार नाही, असा टोमणा मारला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध उपाययोजना या केवळ धूळफेक असल्याचेच राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

ऐतिहासिक निर्णय, अर्थमंत्र्यांच्या पाठीवर मोदींकडून शाबासकीची थाप

राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा हाऊडी मोदी कार्यक्रमावर निशाणा साधला. ह्युस्टनमध्ये होणारा हा कार्यक्रम आतापर्यंतचा सर्वाधिक खर्चिक कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली. मोदींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर जी वेळ ओढवली आहे. ती कोणताही कार्यक्रम लपवू शकणार नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

युतीचा फॉर्म्युला ठरलाय, दोन दिवसांत कळवूः उद्धव ठाकरे

निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने काही उपाययोजनांची शुक्रवारी सकाळी घोषणा केली. यामध्ये प्रामुख्याने कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यांच्या घोषणेनंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकाने उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १९०० अंकांनी वर आला. गुंतवणूकदारांनी अर्थमंत्र्यांच्या घोषणांचे स्वागत केल्याचे दिसून आले.