पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजकीय स्थैर्यासाठी लोकांचा भाजपवरच विश्वास, कर्नाटक निकालानंतर मोदींचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजकीय स्थैर्यासाठी देशातील जनतेचा भाजपवरच विश्वास आहे. कर्नाटकमधील निकालांवरून हे स्पष्ट झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची हजारीबागमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा उल्लेख केला.

आम्हाला पराभव मान्य, कर्नाटकमधील निकालानंतर शिवकुमार यांचे उत्तर

नरेंद्र मोदी म्हणाले, राजकीय स्थैर्य किती आवश्यक आहे, यावर देशातील लोक काय विचार करताहेत आणि राजकीय स्थैर्यासाठी त्यांचा भाजपवर किती विश्वास आहे हे सोमवारी पुन्हा एकदा दिसून आले आहे. कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत किंवा जिंकले आहेत. कर्नाटकमधील जनतेने भाजपवर जो विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.

'अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास माझा अजिबात विरोध नाही'

कर्नाटकमधील १५ जागांवरील पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी होते आहे. मतमोजणीच्या आठ फेऱ्यानंतर १५ पैकी १२ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. हाच कल कायम राहिल्यास राज्यातील भाजपसाठी हा मोठा विजय असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे.