पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या खटल्याप्रमाणेच शबरीमलाची सुनावणी, सरन्यायाधीशांची सूचना

शबरीमला मंदिर

शबरीमला प्रकरणात नऊ न्यायाधीशांच्या पूर्णपीठापुढे मांडण्यासाठी नक्की मुद्दे कोणते आहेत आणि कोण ते मांडणार आहे, हे निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील वकिलांना तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. या प्रकरणी सोमवारी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्त्वाखालील पूर्णपीठापुढे सुनावणी झाली. या पीठामध्ये न्या. आर बानूमथी, अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, मोहन शांतनागौदर, अब्दुल माझीर, सुभाष रेड्डी, बी आर गवई आणि सूर्यकांत यांचा समावेश आहे.

शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे द्यावेतः संजय राऊत

या प्रकरणातील सर्व वकील येत्या १७ जानेवारी रोजी भेटणार आहेत. पूर्णपीठाने आज झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, पाच सदस्यीय खंडपीठाने उपस्थित केलेल्या सात प्रश्नांवरच केवळ नऊ सदस्यीय पूर्णपीठ निकाल देईल. या प्रकरणात दाखल झालेल्या फेरविचार याचिकांवर पूर्णपीठामध्ये सुनावणी घेतली जाणार नाही.

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर या प्रकरणात ५० पेक्षा जास्त फेरविचार याचिका दाखल झाल्या आहेत. पण महिलांना मंदिरांमध्ये, मशिदींमध्ये आणि इतर धार्मिक स्थळी प्रवेश देण्यासंदर्भात दाखल झालेल्या सर्वच याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मकता दूर होतेः यशोमती ठाकूर

अयोध्या प्रकरणात ज्या पद्धतीने न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्याच पद्धतीने शबरीमला प्रकरणात सुनावणी घेतली जावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. वरिष्ठ वकील राजीव धवन आणि वैद्यनाथन यांचेही यावेळी न्यायालयाने अयोध्या प्रकरणात पद्धतशीर युक्तिवाद केल्याप्रकरणी कौतुक केले.