पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींनी ध्यान केलेल्या गुहेचे एक दिवसाचे भाडं माहीत आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी गुहेत ध्यान-धारणा केली. त्या गुहेचे एक दिवसाचे भाडे हे ९९० रुपये आहे. या गुहेत अनेक अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.  

या गुहेत वीज, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. दगडाने बांधण्यात आलेल्या या गुहेचा दरवाजा लाकडी आहे. भाविकांना नाश्ता, दोनवेळचे जेवण आणि दिवसातून दोनवेळा चहाची व्यवस्थाही करण्यात येते. त्याचबरोबर सहायकाला बोलावण्यासाठी गुहेत कॉल बेलही लावण्यात आली आहे.

मोदींची केदारनाथ बाबांच्या गुहेत ध्यान-धारणा

गेल्यावर्षी केदारनाथ येथे ध्यान करण्यासाठी आणि गुहेची लोकप्रियता वाढवण्याअंतर्गत गढवाल मंडळ विकास निगमकडून (जीएमव्हीएन) याचे भाडे कमी करण्यात आले आहे. जीएमव्हीएनच्या अधिकऱ्यांनी सांगितले की, या गुहेची निर्मिती पंतप्रधान मोदींच्या सुचनेनंतर करण्यात आली. ही गुहा केदारनाथ मंदिरापासून एक किमी दूर अंतरावर आहे. 

सुरुवातीला या गुहेचे भाडे हे दररोज ३ हजार रुपये होते. पण त्याला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याचे भाडे कमी करण्यात आले. जीएमव्हीएनचे मुख्य व्यवस्थापक बीएल राणा म्हणाले की, जेव्हा ही गुहा गेल्यावर्षी सुरु करण्यात आली. त्यावेळी पर्यटक आणि भाविकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी गुहा किमान ३ दिवसांसाठी बुक करावी लागत होती. पण नंतर ही अट काढून टाकण्यात आली.

प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर मोदी केदारनाथांच्या चरणी