पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधी मतदारसंघाकडे लक्ष द्या, सुप्रीम कोर्टाचा कार्ती चिदंबरम यांना उपरोधिक टोला

कार्ती चिदंबरम

परदेशात प्रवास करण्याची परवानगी मिळवताना न्यायालयाने घातलेल्या अटींची पूर्तता करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जमा केलेले दहा कोटी रुपये परत मिळावेत, यासाठी पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि नवनिर्वाचित खासदार कार्ती चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयच्या सुटीच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. अनिरुद्ध बोस यांचा समावेश होता. आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्या, असा उपरोधिक टोला यावेळी न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना लगावला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कार्ती चिदंबरम यांनी तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी भाजपचे उमेदवार एच. राजा यांचा तीन लाख मतांनी पराभव केला. 

पी. चिंदबरम आणि त्यांच्या मुलाला तात्पुरता दिलासा

न्यायालयात दहा कोटी जमा करण्यासाठी आपण कर्ज घेतले होते आणि त्याचे व्याज मला भरावे लागते आहे. त्यामुळे दहा कोटी रुपये परत मिळावेत, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली होती. आयएनएक्स मीडिया आणि एअरसेल मॅक्सिस खटल्यामध्ये कार्ती चिदंबरम आरोपी आहेत. न्यायालयाने त्यांना परदेशात प्रवासाला मंजुरी दिली होती. पण आधी न्यायालयात दहा कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते.