पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2020: प्रसिध्द पर्यटन स्थळांना 'तेजस' एक्स्प्रेसने जोडणार

तेजस एक्स्प्रेस

तेजस एक्स्प्रेस सारख्या काही ट्रेन सुरु करणार असून या ट्रेन पर्यटन स्थळांशी जोडल्या जातील, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. तसंच, रेल्वे रुळाशेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी मांडण्यात आला. त्यावेळी रेल्वेसाठीच्या काही महत्त्वाच्या घोषणा निर्मला सीतारामन यांनी केल्या.

Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प

देशातील एकूण ५५० रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. २७ हजार किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण केले जाईल. तसंच, सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एकूण १५० ट्रेन धावणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. तसंच, ४ रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. यासाठी १८ हजार ६०० कोटींचा खर्च येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

Union Budget 2020: जाणून घ्या अर्थसंकल्पातील ठळक

दरम्यान, पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसंच, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उदिष्ट्य आहे. देशभरात ९ हजार किलोमीटरपर्यंत 'इकोनॉमि कॉरिडॉर' उभारण्यात येणार आहे. भाजप सरकार २००० किलोमीटरपर्यंतचे किनारी रस्ते तयार करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

'प्रत्येक जिल्ह्यात आयुष्मान भारत रुग्णालय