पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA विरोधात असाल तर तिरंगा फडकवाः ओवेसी

असदुद्दीन ओवेसी (ANI)

एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आंदोलन केले. हैदराबाद येथील दारुस्सलाम येथे आयोजित या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जे लोक एनआरसी आणि सीएए विरोधात आहेत, त्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा, असे आवाहन यावेळी ओवेसी यांनी केले. 

ओवेसी म्हणाले की, जो कोणी एनआरसी आणि सीएएविरोधात आहे, त्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा. त्यामुळे चुकीचा आणि काळा कायदा केल्याचा संदेश भाजपला जाईल. यावेळी ओवेसी यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचली.

रामलीला मैदानावर मोदींची रॅली, ५००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात

एनआरसी आणि सीएएविरोधातील हिंसक आंदोलन चुकीचे असल्याचे ओवेसी यांनी म्हटले. कोणत्याही परिस्थितीत हिंसा नसायला हवी. तुम्हाला कोणी छेडले तरीही हिंसा व्हायला नको. हे आंदोलन किमान सहा महिने चालले पाहिजे. यासाठी आवश्यक ती शांतता राहिली पाहिजे. आपल्याला लोकशाही पद्धतीने सामना करायला हवे, असेही ते म्हणाले.