पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केरळमधील पूरस्थिती आणखी बिघडणार, धरणांतून विसर्ग वाढविला, ४० जणांचा बळी

केरळमधील पूरस्थिती

केरळमध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे धरणांचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. याचा फटका केरळमधील पूरस्थितीला बसणार आहे. पुराच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच केरळमध्ये पूरामध्ये ४० नागरिकांचा बळी गेला आहे. वायनाड जिल्ह्यातील परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापूरमधील पूर कायम

वायनाड जिल्ह्यातील बनासुरासागर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे धरण राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होण्याचे संकट आहे. केरळमध्ये आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यापैकी २० हजार लोक हे वायनाडमधून स्थलांतरित करण्यात आले आहेत.

सलग सहाव्या दिवशी सांगलीत पुराचे पाणी, पाणी पातळी एक फुटाने उतरली

केरळमध्ये दरड कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये ५० हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. पावसामुळे या ठिकाणी मदतकार्याच अडथळे येत आहेत. केरळच्या सात जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. यामध्ये उत्तर केरळमधील वायनाड आणि मलप्पूरम या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. वायनाड जिल्ह्याच्या काही भागात तर गेल्या २४ तासांत ४० सेंटिमीटर पाऊस पडला आहे. या ठिकाणी लष्कर, एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तरीही खराब हवामानामुळे अनेक ठिकाणी बचावकार्यात अडथळे येत आहेत.