पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफबद्दल हे पाच मुद्दे तुम्हाला माहितीये?

पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत

मावळते लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारत आहेत. हे पदच नव्याने निर्माण करण्यात आले असून, केंद्र सरकार आणि तिन्ही सैन्यदले यांच्यातील प्रमुख दुवा म्हणून या पदावरील व्यक्ती कार्यरत असेल. तिन्ही सैन्यदलांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना सल्ला देण्याचे काम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावरील व्यक्तीला करावे लागेल. तीन वर्षांच्या सेवेनंतर बिपीन रावत मंगळवारी लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाले.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफबद्दल महत्त्वाचे पाच मुद्दे

१. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कार्यरत असताना या पदावरील व्यक्तीला इतर तिन्ही दलांच्या प्रमुखांप्रमाणेच वेतन आणि इतर भत्ते मिळणार आहेत. या पदावरील व्यक्तीकडे चीफ ऑफ स्टाफ कमिटी हे सुद्धा पद पदसिद्धपणे असणार आहे.

गूड न्यूज : दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग लवकरच वेटिंग लिस्ट मुक्त

२. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावर पहिल्यांदाच नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याकडे केंद्र सरकारची काम करण्याची पद्धती आणि तिन्ही सैन्यदलांची काम करण्याची पद्धती यामध्ये मेळ घालून एक पद्धत निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम असणार आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्याचबरोबर तिन्ही सैन्यदलांच्या कामांचे गरजेप्रमाणे सुसूत्रीकरण करण्याचेही महत्त्वाचे आव्हान या पदावरील व्यक्तीकडे असणार आहे. 

३. कारगिल आढावा समितीने सन २००० मध्येच अशा पद्धतीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची निर्मिती केली जावी, अशी शिफारस केली होती. के. सुब्रमण्यम या समितीचे प्रमुख होते.

४. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावरील व्यक्ती केंद्रीय संरक्षण मंत्री आणि तिन्ही सैन्यदले यांच्यातील दुवा म्हणून काम करेल. त्याचवेळी आपापल्या सैन्यदलांच्या संदर्भात त्या दलाचे प्रमुख थेटपणे संरक्षण मंत्र्यांशी सल्लामसलत करू शकतात. 

शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात लवकरच बदल

५. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावरील व्यक्ती वयाच्या ६५ वर्षांपर्यंत या पदावर काम करू शकते. सध्या नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग), मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य दक्षता आयुक्त या पदावरील व्यक्तींचे निवृत्तीचे वय ६५ वर्षेच आहे. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख हे त्या पदावरील तीन वर्षांच्या सेवेनंतर किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण केल्यावर (जे पहिले असेल त्याप्रमाणे) या पदावरून निवृत्त होत असतात.