कर्नाटकातील राजकीय संकट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार आनंद सिंह आणि रोशन बेग यांच्यासह पाच आमदारांनी विधानसभाध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेत आमदारांनी विधानसभाध्यक्षांनी राजीनामा स्वीकारण्याची मागणी केली आहे.
कर्नाटक संकटः शिवकुमार यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा 'यू-टर्न'?
दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी विधानसभाध्यक्षांना काँग्रेस आणि जेडीएसच्या १० बंडखोर आमदारांच्या राजीनामा आणि अयोग्यतेप्रकरणी 'जैसे थे' स्थिती ठेवण्याचे आदेश दिले. सरन्यायाधीश रंजन गोगोई. न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने कर्नाटकमधील राजकीय संकटाप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी १६ जुलैपर्यंत स्थगित केली आहे.
Five more rebel Karnataka Congress MLAs including Anand Singh and Roshan Baig(in file pic) have also moved Supreme Court against the assembly speaker not accepting their resignations pic.twitter.com/CYk2qW9DHk
— ANI (@ANI) July 13, 2019
दरम्यान, कर्नाटकातील राजकीय हालचालीदरम्यान काँग्रेससाठी एक चांगली बातमी आली आहे. काँग्रेसचे संकटमोचक नेते डी के शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांची भेट घेतली असून या आमदारांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. 'आम्ही आमचा राजीनामा दिला होता. पण आता डी के शिवकुमार आणि इतर नेत्यांशी भेट झाली आणि त्यांनी आम्हाला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मी सुधाकर राव आणि इतर आमदारांशी चर्चा करेन आणि मग पाहू काय करता येईल', अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार एमटीबी नागराज यांनी दिली. 'अखेर मी अनेक दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये आहे', अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
..अन्यथा परिणामाला सामोरे जा, सिद्धरामय्यांचा बंडखोरांना इशारा