पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यूपीत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ५ जण ठार

यूपीत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ५ जण ठार

उत्तर प्रदेशमधील शामली येथे एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष आहेत. कैरानाचे उपविभागीय अधिकारी मणी अरोरा यांनी पाच लोकांच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला स्थगिती

मिळालेल्या माहितीनुसार, शामली येथे दिल्ली सहारनपूर महामार्गावरील एका फटाक्याच्या कारखान्यात सायंकाळी उशिरा स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की, त्याचा आवाज अनेक किमीपर्यंत गेला. आवाजामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्फोटात मानवी अवशेषांचे तुकडे आजूबाजूला पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकार, प्रशासकीय अधिकारी आणि अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. 

निर्भयाच्या आईला दोषींच्या वकिलांनी दिले आव्हान, म्हणाले...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश देत पीडितांना सर्वतोप्रकारची मदत करण्याची सूचना केली आहे. दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

जामिया गोळीबार: तरुणाची रवानगी प्रतिबंधात्मक कोठडीत