पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

RSS प्रमुख मोहन भागवत पहिल्यांदाच विदेशी माध्यमांशी साधणार संवाद

सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या विचारधारेबाबत चुकीच्या धारणा स्पष्ट करण्यासाठी पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवत माध्यमांशी संवाद साधणार आहेत. याच महिन्यात हा कार्यक्रम होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघ पहिल्यांदाच अशा प्रकारचे पाऊल उचलत आहे. या बैठकीचे समन्वय करत असलेल्या संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान वगळता विविध देशातील ७० विदेशी माध्यमांना यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी सातत्याने संघावर टीका केली आहे. 

पावसासाठी बेडकांचं लावलं लग्न, अतिवृष्टी झाल्यानंतर घेतला काडीमोड

संघाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, या 'ब्रीफिंग'चा मुख्य उद्देश हा विविध मुद्यांवरील संघाचा दृष्टीकोनाबरोबरच संघटनेबाबत अनेक वर्षांपासून असलेल्या चुकीच्या शंका दूर करणे आहे. संघाच्या अन्य एका पदाधिकाऱ्याने म्हटले की, या बैठकीचा मुख्य उद्देश हा संघ आणि त्यांच्या विचारधारेबाबत चुकीच्या धारणा दूर करणे आहे.

ते म्हणाले की, भागवत यांच्याकडून ही एक अनौपचारिक बैठक असेल. याची बातमी किंवा प्रसारण करण्यास परवानगी नसेल. कार्यक्रमाशी निगडीत एका पदाधिकाऱ्याने म्हटले की, बैठकीच्या सुरुवातीला मोहन भागवत यांचे आरंभीचे भाषण होईल. त्यानंतर प्रश्न-उत्तराचे सत्र असेल. याचे आयोजन आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात केले जाणार आहे.

दोन आंबे चोरण्याच्या आरोपावरून दुबई विमानतळावरून भारतीयाला अटक