पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१७ व्या लोकसभेचे पहिले सत्र ६ जूनला सुरु होण्याची शक्यता

संसद भवन

देशातील १७ व्या लोकसभेचे पहिले सत्र हे दि. ६ ते १५ जूनपर्यंत चालण्याची शक्यता आहे. 'भाषा' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ३१ मे रोजी होणाऱ्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत संसदेच्या सत्राबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

गरिबांना हक्कासाठी एवढी वर्षे वाट का पाहावी लागली, मोदींचा सवाल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ३० मे रोजी राष्ट्रपती भवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. हा त्यांचा दुसरा कार्यकाळ असेल. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनाही शपथ दिली जाईल. ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता शपथ देतील. 

उद्योगपती रतन टाटा RSS च्या तृतीय वर्गाचे प्रमुख पाहुणे

पंतप्रधानपदाचा आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन दुसऱ्यांदा पदाची शपथ घेणारे मोदी हे भाजपचे पहिले नेते आहेत. त्याचबरोबर ते जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर पूर्ण बहुमताने सलग दुसऱ्यांदा सत्ता प्राप्त करणारे ते तिसरे पंतप्रधान बनले आहेत. भाजपकडून अटलबिहारी वाजपेयी हे सलग दोनवेळा पंतप्रधान होते. पण त्यांचा पहिला कार्यकाळ हा अवघ्या एक वर्ष ७ महिन्यांचा होता.

मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर पाठवण्याचे काँग्रेससमोर आव्हान